पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल चे शिक्षक श्री.इंगळे सर यांचे जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेत यश…

मंडणगड | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व रत्नागिरी जिल्हा विद्या समिती आयोजित जिल्हास्तरीय माध्यमिक शिक्षक निबंध स्पर्धेत पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल, पणदेरी चे विज्ञान शिक्षक श्री.इंगळे आर.व्हि.यांनी तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला होता.त्यांच्या निबंधाची निवड जिल्ह्यासाठी झाली होती.जिल्हास्तरावर माध्यमिक शिक्षक गटात श्री. इंगळे आर.व्हि.यांच्या निबंधाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.प्रस्तुत निबंधाची निवड राज्य स्तरासाठी झाली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल मंडणगड तालुका विकास मंडळ F-1428 मुंबई या संस्थेचे अध्यक्ष,सचिव,सर्व सदस्य,शालेय समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ ,शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक ,सर्व पालक , व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.