डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधान गौरव दिनानिमित्त परीक्षेचे आयोजन

मंडणगड | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठ संचलित, विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संविधान गौरव दिनानिमित्त संविधान गौरव स्पर्धा राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुळगावी आंबडवे येथे परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा मुख्य हेतु म्हणजे सर्व विद्यार्थी व जनतेला संविधानाप्रति जागरूक करणे, त्यांच्यात संविधान विषयक चिकित्सा निर्माण करणे, प्रत्येक घरात संविधान पोहचवणे, विद्यार्थ्यांना संविधानाचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

या परीक्षेस महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. दिपक रावेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान गौरव स्पर्धेचे केंद्रप्रमुख सहा. प्रा. अरुण ढंग यांनी काम पाहिले.