नवी मुंबई : नवी मुंबईतील ट्रान्सहार्बर मार्गावरील दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उदघाट्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडणार आहे. 6 महिन्यांपासून दिघा गाव रेल्वे स्थानक तयार असून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होतं. ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा स्टेशनचं उद्घाटन कधी होणार, असा प्रश्न तेथील नागरिकांना पडला होता. या स्थानकाचे उदघाट्न व्हावे यासाठी अनेक राजकीय पक्षांनी विविध आंदोलन केली. अखेर दिघा गाव रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होणार आहे. यामुळे दिघा परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 जानेवारी रोजी देशातील सर्वात लांब सागरी सेतू शिवडी-न्हावाशिवा ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ (MTHL) चे उद्घाटन करतील. याशिवाय उरण रेल्वे मार्गाच्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या टप्प्याचे देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. त्याचा विस्तार खारकोपर ते उरणपर्यंत होणार आहे.












