शिक्षेसह ५० हजार दंड
खेड | प्रतिनिधी : जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या विवहितेला कोयतीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तालुक्यातील तळे येथील एकास १२ वर्षाची सक्तमजुरी व ५० हजार रुपयांचा दंडा ची शिक्षा अति. सत्र न्यायालय – १ खेड चे न्यायाधीश डॉ. सुधीर एम. देशपांडे यांनी सुनावली.
या गुन्हयामध्ये लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी संतोष लक्ष्मण पालांडे रा. तळे, ता. खेड, जि. रत्नागिरी यांस भा.द.वि. कलम ३७५ ( १ ) या कलमाखाली १२ वर्ष सश्रम कारावास आणि रुपये ५० हजार – इतका दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच भा.द.वि. कलम ५०६ या कलमाखाली ३ वर्षे शिक्षा आणि १० हजार इतका दंड आणि दंड न भरलेस ६ महिने साधी कैद ठोठवणेत आलेली आहे.
थोडक्यात हकिकत अशी की,तालुक्यातील कुडोशी येथे राहणारी पिडीता ही जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेली असता तिला कोयतीचा धाक दाखवुन तिच्यावर अत्याचार केला म्हणुन भा.द.वि. कलम ३७६ (१), ५०५ अन्वये खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेत आलेला होता. सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकुण १४ साक्षीदार तपासणेत आले. आणि परिस्थितीजन्य पुरावा कोर्टासमोर मांडणेत आला.
सदर प्रकरणी सरकारी वकील अॅड. सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजुने, युक्तीवाद करुन संपुर्ण केसचे कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार श्री. एच.डी. मोरे, तसेच खेड पोलीस ठाणेचे कोर्ट ऑर्डरली श्री. चंद्रमुनी ठोके व राम नागुलवार यांचे अनमोल सहकार्य लाभले.












