लोटे माळ येथे घरातून अज्ञात चोरट्याने चोरले २ मोबाईल

खेड(प्रतिनिधी) : लोटे माळ येथील प्रकाश शिंदे यांचे चाळीत भाडयाने राहत असलेल्या एका रूम मधून सुमारे २२ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ८ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
या प्रकरणी  संजय गणपत चव्हाण यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे फिर्यादी यांचे घरामतील किचनमधील मागील दरवाजा हा रात्री झोपतेवेळी बंद करायचा विसरल्याने फिर्यादी यांचे पत्नी व मुले झोपलेले असताना त्याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने   घरामध्ये प्रवेशकरून घरामध्ये ठेवलेल दोन मोबाईल चोरून नेले. यामध्ये १७ हजार किंमतीचा विवो कंपनीचा २९ मोबाईल, ५ हजार रू. किंमतीचा विवो कंपनीचा वाय १२ मॉडेलचा मोबाईल असा एकूण २२ हजाराचे मोबाईल चोरून नेले.