वेंगुर्ले : प्रतिनिधी
नणंद, पती, सासू, दिर, भावजय यांनी वारंवार पैशांची मागणी करून आपल्याला मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ करून मारहाण केली अशी तक्रार वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली येथील श्रुती गोरक्ष वरसकर, वय 40 वर्षे यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी भा. द. वी. क. 498(अ), 354, 323, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडे वरसकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपले सासर वराड ता. मालवण येथे आहे. दि. 24/12/2016 ते दि. 29/04/2017 या मुदतीत आपली मोठी नणंद सौ. देवयानी बांदिवडेकर हिचे सांगणेवरुन पती गोरक्ष प्रभाकर वरसकर, सासु श्रीमती शोभा प्रभाकर वरसकर, दिर जयदेव प्रभाकर वरसकर, जाऊ सौ. वैष्णवी जयदेव वरसकर यांनी आपल्याकडे वारंवार पैशांची मागणी करून मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ करून मारहाण केली. तसेच आपले मोठे दिर देवदत्त प्रभाकर वरसकर यांनी माहे फेब्रुवारी ते मार्च 2017 चे दरम्याने माझ्या एकटेपणाचा फायदा घेऊन हात धरून जवळ ओढून माझ्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करून तिने कोणाला काही सांगू नये म्हणून जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे. म्हणून आपण ही तक्रार करत आहे असे म्हटले आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा मालवण पोलीस ठाणे हद्दीत घडलेला असलेने पुढील तपासाकरीता मालवण पोलीस ठाणेत वर्ग केला असल्याचे वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सांगितले.










