Shivshahi bus accident in Karnala pass, 1 killed and 25 injured
पनवेल : मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंडीत झालेल्या भीषण अपघातात शिवशाही बसमधील 25 प्रवासी जखमी झाले असून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघाताचे वृत्त समजताच पेण येथील अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या मालकीच्या 2 रुग्णवाहिकेसहित घटनास्थळी धाव घेत बस मधील रुग्णांना सर्वात आधी मदत केली.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, पनवेलहून महाडकडे भरधाव वेगाने शिवशाही बस (एमएच 09 EM 9282) ही निघाली होती. कर्नाळा खिंडीतील एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस मध्ये असणाऱ्या दुभाजकाला धडक देऊन पलटी झाली. या बसमधून 38 प्रवासी आणि चालक व वाहक असे एकूण 40 जण प्रवास करत होते. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 22 प्रवाशी जखमी झाले आहेत.
सदर अपघातामध्ये दिप्तेश मोरेश्वर टेमघर (31 रा. अष्टमी, ता.रोहा) याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रवाशांमध्ये नामदेव पवार (40 रा. विलेपार्ले), अर्चना सुतार (30 रा.कामोठे), चिन्मय सुतार (12 रा. कामोठे), पुरुषोत्तम मेहता (77 रा. गोरेगाव), रणधिर भोईर (44 रा. जांभूळटेप), सुजित मोरे (51 रा. महाड), मुक्तार इस्माईल कातील (70 रा. बोर्ले), भौमिक नामदेव पवार (32 रा. महाड) तसेच पेण येथील हॉस्पिटल येथे कुंदा सावंत (58 रा.कशेडी), कुंजलता पाटील (53 रा.गोरेगाव), विशाखा सपकाळ (35 रा. आमडोशी), विजय सपकाळ (48 रा.आमडोशी) तर कामोठे एमजीएम रुग्णालयात चेतन आंबावले (33 रा.साईनगर, पनवेल), तनुष्का बोंबले (11 रा. कामोठे), अनुष्का बोंबले (12 रा.कामोठे), कबीर भोईर (58 रा. विर), शोभा शेलार (48 रा.महाड), नईम नसीर खान (26 रा. गोरेगाव), पुर्विल शिंदे (16 रा. सुधागड), लता तळेगावकर (42 रा. पारगाव, पनवेल), मितेश राणे (20 रा. नालासोपारा), विस्मय शिंदे ( 15 रा. सुधागड), मोहम्मद तौकिब सुर्वे (35 रा. नालासोपारा), तेजश्री वाडवळ (33 रा. माणगाव), राजश्री सपकाळ (60 रा.महाड) हे जखमी उपचार घेत आहेत. तर बस चालक हर्षल तायडे (38 रा. नागपूर) व कंडक्टर राजेश मेहता (55 रा. चारकोप, मुंबई) हे सुखरुप बचावले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पथक तसेच पळस्पे वाहतूक शाखेच्या वरिष्ट पोलिस निरीक्षक स्मीता जाधव व त्यांचे पथक घटना स्थळी दाखल होत त्यांनी मदत कार्य सुरु केले.
शिवशाही बस अपघाताचे वृत्त समजताच पेण येथील अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या मालकीच्या 2 रुग्णवाहिकेसहित घटनास्थळी धाव घेत बस मधील रुग्णांना सर्वात आधी मदत केली. जखमींना आपल्या दोन रुग्णवाहिकेमधून पनवेल उपजिल्हा रुग्णालय तसेच कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यास तात्काळ मदत केली. दरम्यान याच मार्गावर एका रेनॉल्ट्स कंनीच्या कारचाही अपघात झाला होता. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका पुन्हा सुरु झाली असून या अपघातांमुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पनवेल तालुका व ट्रॅफिक पोलिसांच्या प्रयत्नांनी सदर वाहतूक सुरळीत करण्यात आली.