खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा पद्ग्रहण सोहळा पार

खेड(प्रतिनिधी) : खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन  चा पदग्रहण सोहळा साई रिसॉर्ट खेड येथे नुकताच पार पडला. डॉ. श्याम गिल्डा यांची असोसिएशन च्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली. या  समारंभात अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्विकारला. सचिव डॉ. आदेश भोसले, खजिनदार डॉ. सिद्धेश चिखले, कायदेविषयक सल्लागार डॉ. विलायत मुकादम, डायरेक्टर ऑफ बोर्ड डॉ. निलेश भोसले आणि डॉ. तुषार मोरे, कोअर कमिटी मेंबर्स डॉ. दीपक मोरे, डॉ. प्रविण राठोड, डॉ. अर्चना स्वामी, डॉ.परेश मळणगावकर यांची नियुक्ती झाली.

या सोहळ्यासाठी रुबी एल्केयर सर्व्हिसेस प्रा.ली. यांचे सेंट्रल मॅनेजर श्री. प्रकाश म्हात्रे, मार्केटिंग हेड श्री. राकेश गिरमे , ह्यूमन रिसोर्स च्या प्रियांका मॅडम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे रुबी एल्केअर चे डॉ. स्वप्नील शिंगणे यांनी  च्या कामाची प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या. मावळते अध्यक्ष डॉ. अजित भोसले यांच्या भरीव कार्याची दाखल घेतली आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नुतन अध्यक्ष डॉ. श्याम गिल्डा यांनी संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचे तसेच समाजउपयोगी, आरोग्य विषयक तसेच इतर कार्यक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. सूत्रसंचालन डॉ.अखिल पवार आणि डॉ. सुक्षेम सारंग यांनी केले.  सचिव डॉ. आदेश भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.