खेड (प्रतिनिधी) भरणेतील श्री देवी काळकाई मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी महेश जगदाळे, उपाध्यक्षपदी सुनील चिले, सुरेश भुवड, तर सचिवपदी प्रशांत चव्हाण, सहसचिवपदी संदीप खेराडे यांची निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष सचिन जाधव, सचिव सुजित शिंदे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने मंदिर विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. खजिनदारपदी सतीश पाटणे, सहखजिनदारपदी विजय फागे, तर सदस्यपदी सचिन जाधव, सुजित शिंदे, कमलेश शिगवण, अंकुश भुवड, राजेंद्र शिर्के, मधुकर शिंदे, सुरेश धुमाळ, प्रदिप भुवड तसेच पुजारी म्हणून अनंत जंगम यांची निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल आमदार योगेश कदम व शिवसेनेचे सचिव सिद्धेश कदम यांच्या हस्ते जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जि.प.सदस्य अरूण कदम, शहरप्रमुख कुंदन सातपुते, स्वप्निल सैतवडेकर, राजेश बुटाला, शंकर कांगणे, सचिन धाडवे, सतिश चिकणे, महेंद्र भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.










