खेड(प्रतिनिधी) शहरातील आस्क मी कॉम्प्युटर सोल्युशनतर्फे एमएससीआयआय व क्लिक प्रशिक्षणातील गुणवंत विद्यार्थ्यांचा येथील पाथरजाई मंदिरात सत्कार करण्यात आला.
एमएससीआयआयमध्ये मसिरा परकार, प्रांजल मनवळ, तनिष्का वडके यांनी पहिले तीन क्रमांक तर सरिना चिष्टी हिला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. ॲडव्हॉन्स एक्सेलमध्ये दीक्षा घडशी हिने प्रथम तर टॅली रँकरमध्ये सुरज कासार याने प्रथम क्रमांक पटकावला. न्यू इंडिया एंश्योरन्स कंपनीचे विकास अधिकारी हनिफ घनसार, दिपाश्री पाटणे यांच्याहस्ते गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आस्क मी सोल्युशनचे संचालक अमोघ पाटणे, विनय शिरगावकर आदी उपस्थित होते.










