खेड(प्रतिनिधी) खेड शहरातील तांबे मोहल्ला येथील ऊर्दुशाळेच्या समोर जगबुडी नदीच्या पात्रात एका अज्ञात पुरुषाचा पाण्यात तरंगताना मृतदेह १३ जानेवारी रोजी सांयकाळी वाजण्याच्या सुमारास आढळुन आला.
याबाबत ची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आला असून या मृतदेहाची अद्यापि ओळख पटलेली नाही पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.








