लोटे मध्ये ट्रक वरून पडून एकाचा मृत्यू 

खेड(प्रतिनिधी) उभा असलेल्या ट्रक मध्ये माल काय हे बघण्यासाठी गेलेल्या एका ४३ वर्षीय इसम ट्रक वरून पाय घसरल्याने  खाली कोसळून गंभीर जखमी झालेल्या चा उपचारा दरम्यान मृत्यू झाला ही घटना २१ जून रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास लोटे मधील कोंजन प्लांट येथे घडली होती
पिन्टू बबन सिंह वय ४३ वर्षे, रा. घरडा केमिकल कंपनीच्या मागे, लोटे, ता. खेड, जि.रत्नागिरी मुळ रा. सुंदरपूरकुडीया, पोस्ट-बलुआ, ता. चंदावा, जि. भोजपूर, राज्य-बिहार असे त्या मृतकाचे नाव आहे
 लोटे येथील कोजन प्लांट येथे अश्विनी इंजिनिअरींग इन्डस्ट्रीज या कंपनीचा माल ट्रकनं.एम एच १२ एल टी ९०९६   कंपनीचा लोखंडी माल घेवून थांबलेला होता त्यावेळी यातील मयत हा सदर ट्रकमध्ये काय माल आहे पाहण्यासाठी ट्रकमध्ये चढले असता मयत याचा ट्रकमधील लोखंडी सामनावरुन पाय घसरून पडल्याने याच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाल्याने मयत यास प्रथम लवेल व त्यानंतर कळंबणी येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले असता तेथिल डॉक्टरांनी त्याला तपासून तो मयत झाल्याचे घोषीत केले . या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे