वेताळ प्रतिष्ठान च्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..
वेंगुर्ले | प्रतिनिधी : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला, तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूल येथील जैतिराश्रीत संस्थेच्या कर्मयोगी रामभाऊ तुळसकर सभागृहात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा शालेय लहान गट व मोठा गट आणि इंग्रजी माध्यम विशेष गटांमध्ये आणि संस्कृत गणपती स्तोत्र पाठांतर आणि मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धा अशा पाच गटात संपन्न झाली.
सदर वक्तृत्व व पाठांतर स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत पार्वती वाचनालयाचे अध्यक्ष सगुण माळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर जैतिराश्रित संस्थचे खजिनदार कृष्णा तावडे व स्थानिक प्रतिनिधी प्रकाश परब, लोकमान्य बँक चे पुरुषोत्तम राऊळ, संदीप तुळसकर,प्रा.व्ही पी. नंदगिरीकर,संजय पाटील, विवेक तिरोडकर,महेश राऊळ, प्रा.विवेक चव्हाण, सुधीर चुडजी, मंगेश सावंत, गुरुदास तिरोडकर,केशव सावंत,अजित राऊळ, प्रा. वैभव खानोलकर, बी.टी. खडपकर, बाबुराव खवणेकर,अनिकेत ताम्हणकर, विनायक शेवडे, संजना तुळसकर,माधव तुळसकर,सचिन गावडे,मिलन तिरोडकर, हेमलता राऊळ, वैष्णवी परुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गणपती स्तोत्र पाठांतर स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्ह्यातील ४१ स्पर्धक तर मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेत ४३ स्पर्धक सहभागी झाले.शालेय गट वक्तृत्व (इ.७वी पर्यंत) गटासाठी *’मोबाईल हटवा बालपण वाचवा’* या विषयासाठी २१ स्पर्धक सहभागी झाले तर शालेय गटासाठी( ८वी ते १०वी) वक्तृत्व स्पर्धेत *’कल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज ‘* हा विषयावर १९ जणांनी भाष्य केले. तर इंग्रजी माध्यम गटासाठी *’दि ग्रेट लीडर छत्रपती शिवाजी महाराज’* विषयावर ११ जणांनी वक्तृत्व सदर केले. सदर सगळ्या स्पर्धेत एकूण १३५ स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
*संस्कृत गणपती स्तोत्र पाठांतर स्पर्धा(इ .२री पर्यंत)*
*प्रथम* : तनय चंद्रशेखर कुशे (रोझरी विद्यालय, मालवण)
*व्दितीय* : अदिती रोहन नाईक (केंद्रशाळा वेतोरे न.२)
*तृतीय:* मांगल्य वासुदेव बर्वे (सुधाताई कामत शाळा नंबर २, सावंतवाडी)
*उत्तेजनार्थ प्रथम*: शर्वणी बाबुराव आपटे ( वेंगुर्ला न.१)
*उत्तेजनार्थ द्वितीय*: भूमी सचिन परुळकर ( वेताळ विद्यामंदिर, तुळस)
*मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धा (इ.३री ते ४थी)*
*प्रथम* : दुर्वा रामचंद्र सावळ
*व्दितीय*: दुर्वांकर दिगंबर जामदार (
*तृतीय:* देवेश भगवान नवार ( भेंडमळा,वेंगुर्ला)
*उत्तेजनार्थ प्रथम* :- अथर्व अश्विनीकुमार मांजरेकर (जि. प.शाळा, तेंडोली)
*उत्तेजनार्थ द्वितीय* : संजीत संदीप तुळसकर ( स्वामी विवेकानंद विद्यालय ,तुळस)
*शालेय वक्तृत्व स्पर्धा(लहान गट इ.७वी पर्यंत)*
*प्रथम*: स्पृहा सुमित दळवी (केंद्रशाळा नं.०१ दोडामार्ग)
*व्दितीय*: शमिका राजन आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल)
*तृतीय*: प्रणोती विठ्ठल राऊळ ( गजानन विद्यालय,पाट)
*उत्तेजनार्थ प्रथम*: यज्ञेश युवराज शिंदे (नेमळे हायस्कूल)
*उत्तेजनार्थ द्वितीय*: हर्षदा गणेश जोशी ( गजानन विद्यालय, पाट)
*शालेय वक्तृत्व स्पर्धा (मोठा गट: इ. ८वी ते १०वी)*
*प्रथम*: श्रावणी राजन आरावंदेकर ( कुडाळ हायस्कूल)
*व्दितीय*: दीप्ती तीमाजी गवसकर ( सरस्वती विद्यालय आरवली)
*तृतीय*: अनुष्का शेखर धुरी ( असोली हायस्कूल)
*उत्तेजनार्थ प्रथम*: साक्षी महेश तुळसकर (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा)
*उत्तेजनार्थ द्वितीय*: रश्मी मधुकर भगत (मठ हायस्कूल)
*शालेय विशेष गट:(इंग्रजी माध्यम: इ.१०वी पर्यंत)*
*प्रथम*: तनिष विवेक नवार ( सिंधुदुर्ग विद्यानिकेतन)
*व्दितीय*: वेदश्री विवेक चव्हाण (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन)
*तृतीय*: मानसराज महेश गवस (
*उत्तेजनार्थ प्रथम*: रूद्र दिगंबर मोबारकर (एम.आर.देसाई, वेंगुर्ला)
*उत्तेजनार्थ द्वितीय*: राजलक्ष्मी नरेंद्र वराडकर ( न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा)
सर्व विजेत्यांचा मान्यवरांकडून प्रमाणपत्र व बुके देऊन गौरव करण्यात आला. संस्कृत गणपती स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे परिक्षण अजित राऊळ व विनायक शेवडे यांनी, मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेचे परिक्षण बाबुराव खवणेकर व अनिकेत ताम्हणकर यांनी,शालेय लहान गट वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षण प्रा.वैभव खानोलकर,संजय पाटील आणि संजना तुळसकर यांनी शालेय मोठा गट मराठी व इंग्रजी माध्यम या दोन्ही गटांचे परिक्षण प्रा. व्ही.पी. नंदगिरीकर आणि बी. टि. खडपकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.सचिन परुळकर यांनी तर आभार किरण राऊळ यांनी मानले.












