आंतर विद्यापीठ स्पर्धा नागपुर येथे संपन्न
मालवण | प्रतिनिधी : टेबल टेनिस खेळाच्या आंतर विद्यापीठ अश्वमेध राज्य स्पर्धा नागपुर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विद्यापीठ प्रतिनिधी सहभागी होते. स्पर्धेत कु. रजत तोरसकर व त्याच्या संघाने याने नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठचे प्रतिनिधित्व केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नागपूर संघाने अतिशय उत्कृष्ट खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेचे रौप्य पदक पटकावले. तर पुणे येथील विद्यापीठ सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.
रजत रविकिरण तोरसकर हा मालवण येथील टोपीवाला हायस्कूल आणि स.का पाटील महाविद्यालयचा माजी विद्यार्थी आहे. नुकत्याच झालेल्या भोपाळ येथील टेबल टेनिस विद्यापीठीय राष्ट्रीय विभागीय स्पर्धा मध्ये कास्य पदक मिळवले होते. त्यामुळे त्याला खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली.
त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.










