मोटरसायकल सह अन्य साहित्य जळून दीड लाखाचे नुकसान
मालवण | प्रतिनिधी : कोळंब भटवाडी येथील साई माळकर यांच्या राहत्या घराच्या पडवीला सोमवारी दुपारी आग लागली. या आगीत गृहपयोगी साहित्यासह त्या ठिकाणी असलेली मोटरसायकल जळून खाक झाली. यासह इतर साहित्य जळून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र भडकलेल्या आगीत माळकर यांची पडवी पूर्णतः जळून गेली.











