देवरुख:- सोमवार दिनांक २२ जानेवारी, २०२४ या शुभदिवशी भगवान प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा समारंभ मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशभर १६ जानेवारी ते २२ जानेवारी, २०२४ या कालावधीची विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून श्रीगणेश वेदपाठशाळा, देवरुख येथे शुक्रवार दि. १९ जानेवारी, २०२४ रोजी सायंकाळी ६:०० वाजता श्री. प्रांजल जोशी, पुणे यांचे ‘मला कळलेली रामरक्षा (रामरक्षा भावार्थ)’या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
या व्याख्यानाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन अध्यक्ष श्री. संजय भागवत यांनी केले आहे.










