शिरगाव येथील श्री पावणादेवीच्या देवालयात रविवार २१ रोजी अखंड हरिनाम सप्ताह

शिरगाव (वार्ताहर) माहेरवाशीणीच्या श्रध्दास्थानी असलेल्या देवगड तालुक्यातील शिरगावचे जागृत ग्रामदैवत श्री पावणादेवीच्या देवालयात पौष शुक्ल पुञदा एकादशी रविवार २१ जानेवारी रोजी सात प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताह भक्तीमय वातावरण साजरा करण्यात येणार आहे.

या हरिनाम सप्ताहास भाविकांनी भजनमंडळीस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे श्री पावणादेवी देवालय विश्वस्त मंडळ, बारा-पाच मानकरी, समस्त ग्रामस्थ मंडळी यानी आवाहन केले आहे