महसुल क्रीडा स्पर्धेत मंडणगड तहसिल कार्यालयाचे कर्मचारी सुरज गायकवाड यांची नेत्रदीपक कामगिरी. अंतीम सामन्यात मँन ऑफ दि मँच चा पुरस्कार 

मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड तहसिल कार्यालयातील कार्यतत्पर युवा महसुल कर्मचारी सुरज गायकवाड यांनी महसुल विभागाचे रत्नागिरी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत जिल्हा संघास सर्वसाधारण विजेतेपद मिळवून देण्यासाठी खेळाडू या नात्याने अतिशय मोलाचे योगदान दिले

त्याबद्दल त्यांचे तहसिल कार्यालय मंडणगड व तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून अभिनंदन होत आहे. क्रीडा स्पर्धेतील क्रीकेट स्पर्धेच्या अंतीम सामन्यात ३७ धावांची आक्रमक खेळी करत मँन ऑफ द मँच हा किताब मिळवून अंतीम सामन्यात जिल्हा संघास विजेतेपद मिळवून दिले. संपुर्ण स्पर्धेत एक फलदांज म्हणून त्यांनी आपल्या खेळाचा ठसा उमटवला. मंडणगड तहसिल कार्यालयात तालुकावासीयांचे महसुलशी संबंधीत कामे मार्गी लावण्यासाठी सतत कार्यरत असणारे श्री. गायकवाड हे उत्तम क्रीकेटपटू असून कार्यालयातील व्यस्त कामातून वेळ मिळाल्यावर खेळाची आवड त्यांनी जोपासली आहे. त्यांच्या कामगीरीचे तालुक्यातून कौतूक होत आहे.