वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी शहरांतील सार्वजनिक ठिकाणी शुक्रवार दि. १९ जानेवारी रोजी स्वच्छता मोहीम करण्यात येणार आहे. शहरातील मंदिरे, मंदिराकडे जाणारे रस्ते, पार्किंग, स्वच्छतागृहे आदी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम करण्यात येणार आहे. याबाबत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कॉन्फरन्स बैठक पार पडली. या बैठकीत स्वच्छता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तरी सदर मंदिर स्वच्छता अभियान व सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये शहरवासीय, नागरिक, शाळा व महाविद्यालये तसेच स्वयंसेवी संस्था यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन मुख्याधिकारी सुरजकुमार कांबळे यांनी केले आहे.








