शिक्षकांनीही लुटला खेळण्याचा आनंद!

कणकवली : १५ जानेवारी ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस संपूर्ण राज्यात राज्यक्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून शंकर महाविद्यालय कुंभवडे शाळेत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये पारंपारिक खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला.
यावेळी मुलांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आली. या सर्व उपक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक श्री. पावसकर यांनी केले.










