भाविकांची दर्शनासाठी गर्दी
बांदा (प्रतिनिधी) : अक्कलकोट हून श्री स्वामी समर्थांची पालखी बांदा शहरातील विठ्ठल मंदिरात आज सकाळी दाखल झाली. यावेळी भाविकांनी श्री स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ च्या जयघोषाने परिसर स्वामिमय होऊन गेला होता. यावेळी आरती व नामस्मरण करण्यात आले. त्यानंतर भाविकांना तीर्थप्रसाद वितरीत करण्यात आला. सकाळी ११ वाजता पालखी घारपी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या दिशेने मार्गस्थ झाली.











