जिल्हा परिषद अहमदनगर च्या समितीने परुळेबाजार ग्रा.पं. तीला भेट देत विविध उपक्रमांची घेतली माहिती…

परुळे | प्रतिनिधी : जिल्हा परिषद अहमदनगर च्या समितीने परुळेबाजार ग्रा.पं. तीला भेट देत विविध उपक्रमांची पाहणी कोली. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत जि. प. अहमदनगरच्या अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांची टिमने आज परुळे येथे ग्रा.पं. तीच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली पं-स नेवासा सहा.गटविकास अधिकारी श्री. पाटेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेटये. गटशिक्षणाधिकारी पं.स-कोपरगाव, विस्तार अधिकारी जि. प. अ. नगर श्री सानपूने, श्री.डोके, श्री. पाखर तसेच जिल्हा व्यवस्थापक आर. जी. फ. ए. विजय गायकवाड यांसह सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आदी उपस्थित होते.

समितीचे स्वागत उपसरपंच संजय दुधवडकर यांनी केले. यावेळी ग्रामसेवक मंगेश नाईक यांनी माहीती दिली. समितीने काथ्याप्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया युनीट, प्रक्रिया युनीट, प्लॅस्टिक कचरा संकलन युनीट, प्रक्रिया संकलन युनीट, अंगणवाडी, शाळा, व्यायामशाळा यांच बरोबर इतर उपक्रमांची माहीती घेनाली व विविध उपक्रयांचे कौतुक केले.