लांजा येथील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत गोपालकृष्ण आगरवाडी संघ विजेता

श्री संत सेना नाभिक समाज लांजाच्या वतीने आयोजन

लांजा (प्रतिनिधी) श्री संत सेना नाभिक समाज लांजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत गोपाळकृष्ण आगरवाडी संघाने विजेतेपद पटकावले.

श्री संत सेना नाभिक समाज लांजाच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री जाकादेवी मंदिर पटांगणावर झालेल्या या स्पर्धेत गोपाळकृष्ण आगरवाडी संघाने विजेते पटकावले. द्वितीय क्रमांक देवधे हरमलेवाडी तर तृतीय क्रमांक करंडादेवी खावडी यांनी पटकावला. चौथा क्रमांक मित्रत्व संघ कोट यांनी मिळवला. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार योगेश पितळे याने पटकावला.

महिला कबड्डी स्पर्धेमध्ये लांजा संघाने विजेतेपद तर खावडी संघाने उपविजेतेपद पटकावले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव हे उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आले. यावेळी नगरसेविका दुर्वा भाईशेट्ये ,नगरसेवक स्वरूप गुरव त्याचप्रमाणे राहुल शिंदे, वैभव जोईल ,लल्या कुरूप, अजय कुरूप, अक्षय यादव, प्रथमेश काटगाळकर, भूषण खानविलकर,

योगेश वाघधरे, अथर्व साळवी, नागेश कुरूप आदी मान्यवर उपस्थित होते

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री संत सेना नाभिक समाज लांजाचे अध्यक्ष प्रथमेश यादव, उपाध्यक्ष गणेश सावंत, सचिव प्रशांत सावंत, खजिनदार ऋषिकेश सावंत, तसेच रुपेश चव्हाण ,प्रभाकर सावंत, श्रीकांत चव्हाण, उमेश सावंत ,योगेश चव्हाण, लक्ष्मण यादव ,राकेश चव्हाण, राहुल सावंत, संजय चव्हाण, चेतन शिंदे, सागर चव्हाण, कौस्तुभ सावंत, गणेश सावंत, रविकांत चव्हाण, उल्हास चव्हाण, अंकुश सावंत, गणेश सावंत, प्रवीण सावंत, केदार यादव, राहुल चव्हाण, सिद्धेश यादव आणि ऋतिक चव्हाण, वेदांग सावंत ,लहू सावंत यांनी मेहनत घेतली.