मिशन आपुलकी, अंतर्गत उपळेवीर शाळेला गिते कुटुंबाकडून लॅपटॉप ब कपाट भेट

लांजा (प्रतिनिधी ) जि प शाळा उपळे वीर शाळेला गीते फार्मचे मालक श्री गीते व त्यांच्या मातोश्री श्रीम गिते यांच्या वतीने कै. सुहास गीते यांच्या स्मरणार्थ एचपी कंपनीचा लॅपटॉप व कपाट भेट देण्यात आले

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती पुजार यांच्या संकल्पनेतून मिशन आपुलकी अंतर्गत शाळेतील भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावकर शांताराम वीर, माजी सरपंच राजा वीर ,शिक्षण प्रेमी सदस्य अशोक वीर ,रमेश पातेरे आनंत वीर यांच्या सहकार्याने शाळेतील शिक्षक दिनेश झोरे, बळीराम सोळंकी यांनी , मुख्याध्यापक दिपक यादव यांच्या मार्गर्शनाखाली याचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार शाळेला गीते कुटुंबाकडून लॅपटॉप ब कपाट देणगी म्हणून प्राप्त झाले.

त्यानिमित्ताने गिते कुटुंबाचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सरपंच सौ. वीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री बंडगर , विस्तार अधिकारी सौ. हिरवे, पूनस केंद्राचे केंद्रीय प्रमुख सुहास आयरे व ग्रामस्थ यांनी सर्वांचे अभिनंदन केले.