सडुरे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

सडूरे – शिराळे ग्रामपंचायत व कै.नारायण शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजन

श्री माऊली क्लीनिकल लॅबोरेटरी वैभववाडी चे विशेष सहकार्य

वैभववाडी | प्रतिनिधी : ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे व कै.नारायण शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सडुरे येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले. या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शुगर कॅल्शियम प्रोटीन अल्बमिन व पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी, प्लेटलेट यांसह इतर रक्त तपासण्या श्री माऊली क्लीनिकल लॅबोरेटरी वैभववाडी यांच्या विशेष सहकार्याने करण्यात आल्या.

यावेळी कै.नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शांताराम उर्फ बाळा गोसावी, सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच अनंत जंगम, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका पाटील, ग्रामपंचायत सदस्या विशाखा काळे, निमअरुळे माजी सरपंच सविता कदम, सुनिता पवार, लक्ष्मी कोकरे, सुनंदा भोसले, अनिता अंगणे, प्रतीक्षा शेळके, शुभांगी राणे, सुरेखा काळे, रवळनाथ देवस्थानाचे अध्यक्ष दत्ताराम रावराणे, आबाजी अंगणे, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, अशोक पाटील व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शांताराम उर्फ बाळा गोसावी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नवलराज काळे यांनी मानले.