जलकुंभ कामाची चौकशी करा अन्यथा २६ रोजी उपोषण

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रा. पं. वडगाव बु. । येथे जलयुक्त शिवार अभियान २०१८-२०१९ कुंभ येथे झालेल्या निकृष्ठ बंधा-याची चौकशी व मंजुर झालेलया बंधा-याचे काम अद्याप चालू का झाले नाही तसेच ग्रा. पं. मध्ये झालेल्या भ्रष्टाचार यांची चौकशी करुन दोषी अधिका-यांवरती व मक्तेदारावरती फौजदारी गुन्हा दाखल करा अन्यथा २६  रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सचिन  अनाजी मोरे यांनी प्रशासनाला दिला आहे
ग्रामपंचायत वडगांव बु। मध्ये सन २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सिमेंट बंधा-याचे काम करण्यात आले होते. परंतु सदर बंधा-याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे सदर बंधारा हा संपुर्ण गळती होऊन बंधा-यावर लाखो रुपये खर्च झाले असताना कोणतीही चौकशी न करता ठेकेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे
दरम्यान ग्रामपंचायत वडगांव बु मध्ये सन २०१६ १७ ते २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये मोठया प्रमाणात ‘भ्रष्टाचार झाला असून सदर कामाची चौकशी करण्यात येवून दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे