शिवतरमध्ये फेब्रुवारीत क्रिकेट स्पर्धा

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील शिवतर कोंड आझाद क्रिकेट क्लबच्यावतीने १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीत प्रभात हायस्कूलच्या प्रांगणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विजेत्यास २५ हजार ५५५ रूपये, उपविजेत्यास १७ हजार ७७७ रूपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व मालिकावीर यांनाही चषक देवून गौरवण्यात येणार आहे. सहभागी होवू इच्छिणाऱ्या संघांनी शिवाजी मोरे यांच्याशी संपर्क साधावा.