देवली येथून वृद्ध बेपत्ता

मालवण | प्रतिनिधी : देवली वरची बंडावाडी येथील सत्यवान कृष्णा चव्हाण (वय ८९)हे वृद्ध १९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता घरातून निघून गेले. सर्वत्र शोधाशोध करुनही त्यांचा कोणताही पत्ता न लागल्याने त्यांचा मुलगा समीर सत्यवान चव्हाण यांनी वडील बेपत्ता असल्याची माहिती मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत बेपत्ता नोंद करून मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत.