राजापूर, दापोली पाठोपाठ धार्मिक भावना दुखावणारे स्टेटस रत्नागिरीतही; एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी 

अयोध्या राम मंदिर सोहळायप्रकारणी धार्मिक भावना दुखावणारे स्टेटस काही समाजकंटकानी सोशल मीडियावर ठेवल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. याप्रकरणी एकविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.

सलमान मुजावर (रा. कोकणनगर, रत्नागिरी ) अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याने इंस्टाग्रामवर बाबरी मशीदच्या फोटोसहित धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट केल्या.यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन वाद निर्माण होईल असे वर्तन केले.याप्रकरणी चंद्रकांत राऊळ यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सलमान विरोधात भादवी कायदा कलम 153 (अ),505 (2),295(अ ) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, पोलीस विभागाकडून सर्व नागरिकांना सोशल मिडियाद्वारे कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश अगर आक्षेपार्ह संदेश व व्हिडीओ प्रसारित करू नये.कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये अथवा बळी पडू नये.

सर्व जातीय धर्मांच्या आक्षेपार्ह घटनांवर कठोर कारवाई करण्यात येणार व अश्या घटनांवर रत्नागिरी पोलीस दलातर्फे कडक धोरण स्वीकारले जाईल.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा राखण्यामध्ये पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे