अणसूर गावातील रांगोळी स्‍पर्धेचे भाजप युवामोर्चा प्रदेश उपाध्‍यक्ष प्रथमेश तेली यांच्‍या हस्‍ते झाले उद्घाटन

वेंगुर्ले l प्रतिनिधी :अणसूर गावातील रांगोळी स्‍पर्धेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्‍यक्ष श्री. प्रथमेश तेली यांच्‍या हस्‍ते फित कापून करण्‍यात आले. अणसूर ग्रामपंचायत सरपंच श्री. सत्‍यविजय गावडे ग्रामस्‍थ व मित्रमंडळी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्‍ठापना निमित्‍ताने अणसूर गावातील सातेरी मंदिर मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आलेले होते. सकाळी श्री देवी सातेरीची विधिवत पूजा करून अभिषेक करण्‍यात आला. त्यानंतर राम मंत्र पठण, महाआरती आणि दुपारी रांगोळी स्‍पर्धा, संगीत खुर्ची, डान्‍स स्‍पर्धा, भजन व फुगडी इत्‍यादी कार्यक्रम घेण्‍यात आले. तसचे सायंकाळी दिपोत्‍सव करण्‍यात आला. दरम्यान रांगोळी स्‍पर्धेमध्‍ये १८ स्‍पर्धकांनी भाग घेतला, संगीत खुर्ची मध्‍ये ५५ स्‍पर्धकांनी भाग घेतला व डान्‍स स्‍पर्धेमध्‍ये ८ स्‍पर्धकांनी भाग घेतला. रांगोळी स्‍पर्धा प्रथम क्रमांक चरित्रा राऊळ, व्दितीय क्रमांक रूचिता रामचंद्र गावडे, तृतीय क्रमांक रूचिता गजानन देऊलकर तर उत्‍तेजनार्थ अनुष्‍का राणे व अन्‍नपूर्णा गावडे. डान्‍स स्‍पर्धा : प्रथम क्रमांक अभंग अमित रगजी, व्दितीय क्रमांक काजल तुकाराम गावडे, तृतीय क्रमांक तेजल तुळशीदास गावडे, संगीत खर्ची प्रथम क्रमांक गौरी गोविंद गावडे, व्दितीय क्रमांक दिव्‍या दिलिप मालवणकर , तृतीय क्रमांक अनुष्‍का राणे यांनी मिळविला. गावकर मंडळी, ग्रामपंचायत सदस्‍य, ग्रामस्‍थ यांच्या उपस्थितीत या विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.