हर्णै येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा आत्मदहनाचा इशारा
दापोली (प्रतिनिधी) लगतचे कब्जेदार यांनी केलेल्या अवैध बांधकाम व त्यांच्या जाचामुळे व त्या संबंधी अद्याप न्याय न मिळल्याने उदया दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा हर्णे येथील हनुमंत तुकाराम सारंग वय वर्ष 75 राहाणार मलखांब पेठ यांनी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अवैध बांधकामाच्या इमारतीमधिल सांडपाण्यामुळे माझ्या विहिरीचे पाणि दूषित झाले आहे. त्यामुळे माझा उदरनिर्वाहाचा एकमेव व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे याबाबत आपण अनेकदा शासन दरबारी पाठपुरा करूनही आपल्याला न्याय मिळत नसल्याची खंत या निवेदनात सारंग यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपल्याला हे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मी वयोवृद्ध नागरिक असून माझ्या राहत्या घराशेजारी असलेल्या जमीन मिळकत माझ्या मिळकतीला लागुन स.न. 215 हि.न. 13 अ, अशी आहे. गेली सात वर्ष त्यांच्या मिळकतीतील अवैध बांधकामामुळे माझे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे, व अजुनही होत आहे. माझा उदर निर्वाहाचा व्यवसाय शोभेचे मासे उत्पादनाचा असुन, सदर मिळकतीमधिल अवैध बांधकामाच्या इमारतीमधिल सांडपाण्यामुळे माझ्या विहिरीचे पाणि दुशित झाले आहे. त्यामुळे माझा उदरनिर्वाहाचा एकमेव व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. संदर्भात प्रकरणात पुढील ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न केला असता न्यायाची अंमलबजावणी झालेली नाही. विभागिय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कोकण विभाग, मे. लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त,हरीत लवाद शाखा पुणे यांच्याकडेही आपण याबाबत तक्रारी केल्या आहेत. याबाबत दिवाणी न्याशधीश कनिष्ठ स्तर, दापोली, नियमीत दिवाणी दावा सुरू असल्याची ही माहिती त्यांनी या निवेदनात दिली आहे. माझ्या मृत्य पश्वात न्याय मिळुन काही उपयोग नाही. माझी न्यायाची बाजु पुर्ण सत्याची असुन CRZ क्षेत्रातील अवैध बांधकामाच्या सांडपाण्याच्या टाकीचा तत्काळ बंदोबस्त व्हावा अशी माझी प्राथमीक मागणी आहे. आणि उपासमारीने लाजीरवाणा मृत्यु येण्यापेक्षा सन्मानाने आत्मदहन करावे अशा विचचारांती मी पोहोचलो आहे असही खळबळजनक विधान त्यांनी या निवेदनात केल आहे.
या देशातील वयोवृध्द नागरीकाना सन्मान नको पण किमान न्याय आणि तोही वेळेवर मिळेल अशी आशा होती अशी खंत त्यांनी या निवेदनात व्यक्त केली आहे.
स्वातंत्रच, संविधान, प्रजासत्ताक दिन, न्याय, प्रशासन यंत्रणा, या सर्वांचा उबग आल्यामुळे माझ्या सारख्या आशावादी व्यक्तींचे धेय आणि आशावाद न्याय यंत्रणेवरील विश्वास मोडुन पडला आहे. माझ्या हातात या शिवाय आता कोणताही पर्याव शिल्लक राहीलेला नाही, शरीरात आणि खिशांत बळ राहीलेले नसल्याने माझ्या सारख्या दुर्दैवी जिवास आत्मदहन करून मरू द्यावे अशी ही भावनिक साद या निवेदनात घातली आहे. त्यामुळे आता या सगळ्याबाबत तालुका प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.











