उज्वला गॅस योजनेच्या नावाखाली दापोली तालुक्यातील अनेक कुटुंबांना गंडा

Google search engine
Google search engine

चंद्रपूर, नांदेड व बीड जिल्ह्यातील 6 आरोपींना ग्रामस्थांच्या सतर्कतेने दाभोळ पोलिसांकडून अटक

दापोली | प्रतिनिधी: उज्वला गॅस कनेक्शन ची माहिती देऊन आपण उज्वला गॅस योजनेचे कनेक्शन देण्याकरिता आलेलो आहोत असे खोटे सांगून दापोली तालुक्यातील अनेकांना लुटणाऱ्या टोळीचा दाभोळ पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने नुकताच पर्दाफाश केला. शिवाय या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवारी दापोली तालुक्यातील उसगाव गणेशवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य ऐश्वर्या आग्रे या यांना गावात येऊन एका टोळक्याने तुमच्याकडे गॅस कनेक्शन आहे का याची विचारणा केली शिवाय आपण पंतप्रधान यांनी सुरू केलेल्या उज्वला गॅस कनेक्शन ची माहिती देऊन सदर योजनेमध्ये आपल्याला गावामध्ये गॅस कनेक्शन येणार असल्याचे सांगितले शिवाय आपण सरकारकडून नेमलेले कर्मचारी आहोत असे देखील सांगितले. यानंतर त्या टोळक्याने त्यांची यांची संपूर्ण माहिती एका फॉर्मवर लिहून घेतली शिवाय पंधरा दिवसांच्या आत गॅस कनेक्शन नवीन शेगडी असे सरकारकडून पुरवण्यात येईल असे सांगितले शिवाय याकरिता आग्रे यांच्याकडून 500 रुपये देखील घेतले व ते टोळके निघून गेले

थोड्या वेळाने आग्रे यांचा भाऊ कौस्तुभ वैद्य याने फोन करून आग्रे यांना आपल्या गावात गॅस कनेक्शन देतो असे खोटे सांगून पैसे उकळणारी माणसं आली आहे अशी माहिती दिली शिवाय तू त्यांना पैसे देऊ नको व कोणतीही माहिती पुरवू नको असे सांगितले यावर आंग्रे यांनी थोड्या वेळापूर्वी तीच माणसे आपल्याकडे येऊन आपल्याकडून पैसे घेऊन गेल्याचे त्यांनी वैद्य यांना सांगितले यावर गावातील लोक या लोकांना आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली त्यांचा शोध घेत असता पंचनदी येथील तारेचा खांब येथे एका स्कॉर्पिओ मध्ये संगीता पवळे-नांदेड, सुनीता बादावत-चंद्रपूर, ममता डोंगरे- अकोला, अशोक जोगदंड-बीड, शामसुंदर जोंजाळ-बीड, विठ्ठल सलगर- बीड आदी 6 व्यक्ती बसलेल्या आढळून आल्या सदर इसमांकडे पोलिसांनी चौकशी केली असता आपण पंतप्रधान उज्वला गॅस योजनेची खोटी माहिती देत असल्याचे व लोकांकडून पैसे लबाडीने घेत असल्याचे कबूल केले आपण कोणत्याही सरकारी किंवा खाजगी संस्थेची संलग्न नाही अशी माहिती देखील या आरोपींनी पोलिसांना दिली लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांनी उसगाव गावातील अनेक महिलांच्या घरी जाऊन पैसे उकळल्याचे निदर्शनास आले यानुसार दाभोळ पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध भादवी 170 34 419 420 465 468 471 अन्वये गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा अधिक तपास दाभोळ सागरी पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत