कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण सोहळा संपन्न

 

कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी येथे

आज दिनांक 26 जनेवारी 2024 रोजी 75 वा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम सोहळा संपन्न झाला . यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री.भारत सावंत निवृत्त एस.टी. कर्मचारी व गुणवंत कामगार पुरस्कार विजेते. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत व प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक श्री.सुरेश अण्णा लिमये,उपस्थिती श्री.रमाकांत पांचाळ, सामाजिक कार्यकर्ते, व माजी कामगार कल्याण संचालिका श्रीमती. मनिषा सरदेसाई, जोशी मॅडम. ज्ञानेश्वरपाटील,कामगार ,नाट्य लेखक , निधी सावंत, रुतुजा पोर्टे, अमृता शेट्ये. यांची कार्यक्रमास उपस्थिती होती पाहुण्यांचे स्वागत

संस्कृती शिंदे, केंद्र महिला कल्याण सहाय्यिका, यांनी केले.पूजा नागवेकर केंद्र सेविका. आणि नागरिक ध्वजारोहणासाठी उपस्थीत होते. पाहुणे व उपस्थितांचे आभार मानुन उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.