विहिरीकरीता गोवा शिपयार्ड कंपनीकडून निधी उपलब्ध
आडिवरे: राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रुक ग्रामपंचायत भागात बेनगी वारिक वाडी येथे त्यांच्या मागणीनुसार व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने व गोवा शिपयार्डचे डायरेक्टर अँड.दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाने रू.५.०० लक्ष निधी गोवा शीपयार्ड कंपनीच्या सीएसआर फंडातून बेनगी येथील पिण्याच्या पाण्याची विहीर सुधारण्यासाठी प्राप्त झाला. या कामाचा भूमिपूजन सोहळा दिपक पटवर्धन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी त्यांनी मार्गदर्शनही केले.
या प्रसंगी इच्छा शक्तीच्या बळावर आपण आपला विकास साध्य करणे हेच ध्येय असले पाहिजे. मग पद कोणतेही असो त्यासाठी इच्छा शक्ती महत्वाची आहे. गोवा शिपयार्ड कंपनी यांच्या कामाबद्दल तसेच कंपनीच्या कार्याबद्दल आपले विचार मांडले. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्याला नवीन ऊर्जा तर दिलीच पण विकास ग्रामीण भागातही प्रत्येकाच्या घरा पर्यंत पोहचला दाखवून दिले आहे. भारतीय जनता पक्ष हा सामान्य माणसाचा पक्ष असून विकास साधण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही असे विचार या वेळी मांडले.
या प्रसंगी गोवा शिपयार्डचे डायरेक्टर अँड. दीपक पटवर्धन, जिल्हा नियोजन समिती सदस्य अण्णा करमरकर, सरपंच आरती मोगरकर, उपसरपंच प्रमोद वारीक,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भोवड, भाजपा तालुका सरचिटणीस बाळ दाते , ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.










