लांजा महाविद्यालयात डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे- युवक आणि साहित्य या विषयावर व्याख्यान संपन्न

लांजा (प्रतिनिधी) कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ सुनीलकुमार लवटे यांचे ” युवकआणि साहित्य” या विषयावर व्याख्यान लांजा महाविद्यालय येथे संपन्न झाले.

या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरविंद कुलकर्णी, डॉ. सुनीलकुमार लवटे ज्येष्ठ साहित्यिक महेश बावधनकर, मराठी विभाग प्रमुख, के.आर. चव्हाण- उपप्राचार्य, डॉ.बी.डी.पाटील -सांगली, गजानन जगताप, मापारी .सुधाकर कांबळे, भाऊ वंजारे ,राजेश गोसावी जिल्हा सचिव, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा शाखेचे अध्यक्ष आनंद शेलार होते. प्रास्ताविक रामचंद्र जाधव यांनी केले.व्याख्यात्याचा परिचय बाळू नागरगोजे यांनी केला. सदर प्रसंगी डॉ.माया तिरमारे, प्रकाश हरचेकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रा. प्रदीप कदम यांनी आभार मानले. आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा विभाग प्रमुख प्रा.विशाखा पावसकर यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप श्रीम. वर्षा कांबळे यांच्या सुरेल आवाजात पसायदान गायनाने झाला