मंदरुळ नगरीत पार पडला राजापूर बिग बॅश ट्रॉफी थरार

स्पर्धेत स्वाभिमान क्रिकेट संघ ठरला विजयी

लांजा (प्रतिनिधी) राजापूर तालुक्यातील मंदरूळ येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात स्वाभिमान क्रिकेट संघाने गांगेश्वर खरवते संघावर मात करत विजेतेपद पटकावले.राजापूर तालुक्यात प्रथमच लिलाव पद्धतीने खेळाडू विकत घेऊन साखळी सामन्यांचे निजोजन करण्यात आले होते. अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन फ्रेंड्स ग्रुप मंदरूळ आणि श्री. समर्थ इंटरप्रायजेस दादर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन परशुराम भानू मासये (गावप्रमुख मंदरुळ) आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.

स्पर्धे दरम्यान तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील अनेक दिग्गज मान्यवरांची मांदियाळी पहायला मिळाली. ओणी पंचायत समिती अंतर्गत ८ व्यावसायिक संघमालकानी आपल्या संघा समवेत या स्पर्धसाठी आपला प्रवेश निश्चित केला होता. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी अनेक तरुणांनी आपले बहुमूल्य योगदान दिले.

यामध्ये सुशांत मासये सचिन मासये कु.सूरज मासये, कु.तेजस मासये, कु. रुपेश नारकर, कु. पंकज पांचाळ, कु. दिव्येश मासये, कु.प्रदिप मासये कु.अजय नारकर, सुनिल वि. मासये, विजय मासये तसेच गावातील अनेक कार्यकर्त्यांचे या स्पर्धेला भरीव असे योगदान लाभले.स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्वाभिमान क्रिकेट संघ विरुद्ध गांगेश्वर खरवते अशी लढत पहायला मिळाली. स्वाभिमान संघाच्या संकेत कडू आणि महेश भाबळे यांनी झंझावती खेळी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून ऋषिकेश कुंभार, उत्कृष्ट गोलंदाज समीर शिंदे आणि मालिकावीर म्हणून संकेत कडू याला सन्मानित करण्यात आले.