हुतात्मा दिनानिमित्त उद्या नगरपरिषदेतर्फे वाहणार आदरांजली

सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी वाजणार भोंगा

नागरीकांनी उभे राहून आदरांजली वाहण्याचे आवाहन

सावंतवाडी । प्रतिनिधी : देशाच्या स्‍वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो . हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयामार्फत उद्या मंगळवार दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी ठीक १० वाजून ५८ मिनिटांनी भोंगा वाजविणेत येईल. यावेळी शहरातील सर्व नागरिकानी जिथे असतील त्या जागेवर उभे राहून आदरांजली वाहावी तसेच सकाळी ११ वाजता दूसरा भोंगा देण्यात येईल त्या वेळी सर्वानी पूर्ववत आपले काम सुरू करावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.