भाजप नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत व्यापारी बांधवांची मालवणात भव्य मोटरसायकल रॅली

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या मेळाव्याच्या निमित्ताने आयोजन : मुख्य कार्यक्रमस्थळी व्यापार प्रदर्शनी व मेळावा सभामंडपचेही उदघाटन

अमित खोत | मालवण : सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या आयोजकत्वखाली सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 36 वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा परंपरेस अनुसरून बुधवार 31 जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे संपन्न होत आहे. या निमित्ताने सोमवारी सायंकाळी भाजप नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत व्यापारी बांधवांची भव्य मोटरसायकल रॅली मालवण शहरातून काढण्यात आली.

या दरम्यान राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाच्या ठिकाणी जात निलेश राणे व व्यापारी पदाधिकारी यांनी पूजन केले. तर रॅली सांगतेनंतर टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे मुख्य कार्यक्रमस्थळी व्यापार प्रदर्शनी व मेळावा सभामंडपचे उदघाटन निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सर्व स्टॊलला भेट देऊन व्यापारी बांधवांशी निलेश राणे यांनी संवाद साधला. यावेळी व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर, मालवण अध्यक्ष उमेश नेरुरकर, प्रमोद ओरसकर, नितीन तायशेटये, स्वप्नली नेरुरकर यांसह व्यापारी, युवा व्यापारी, महिला व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालवण व्यापारी संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने यावर्षी मेळाव्यासोबत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. निलेश राणे यांच्या सौजन्याने महाराष्ट्राचे विनोदवीर यांच्या सहभागतून ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम, कुशल बद्रीके, सागर कारंडे, आशिष पवार, श्रेया बुगडे तसेच लिटिल चॅम्प फेम रोहित राऊत, जुईली जोगळेकर यांचा विविधरंगीं कार्यक्रम. तसेच 30 जानेवारी सायं. 7 वा. महानाट्य ‘अयोध्या’ आयोजन आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांच्या एकजुटीचे प्रतीक असलेला हा मेळावा अनेक मान्यावर यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. तरी व्यापाऱ्यांच्या या वार्षिकउत्सवास सहपरिवार उपस्थित राहावे. असे आग्रहाचे निमंत्रण व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, मालवण अध्यक्ष उमेश नेरूरकर, मालवण तालुकाध्यक्ष प्रमोद ओरसकर यांनी केले आहे.