अंकोला- नंदीकूर दरम्यान १ ला मेगाब्लॉक

खेड | प्रतिनिधी : अंकोला-नंदीकूर विभागादरम्यान १ फेब्रुवारी रोजी सकाळी १२.१५ ते दुपारी २.१५ यावेळेत मालमत्ता देखभालीच्या कामासाठी २ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
१६५८५ क्रमांकाची सर एम. विश्वेश्वरैय्या टर्मिनल बेंगळूर- मुर्डेश्वर एक्सप्रेसचा ३१ जानेवारी रोजी सुरू होणारा प्रवास कुंदापूरा स्थानकापर्यंत कमी केला जाईल. कुंदापूरा- मुर्डेश्वर विभागादरम्यान अंशतः रद्द होईल. १६५८६ क्रमांकाच्या मुर्डेश्वर-सर एम. विश्वेश्वरैय्या टर्मिनल बेंगळूर एक्सप्रेसचा प्रवास १ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास कुंदापूरा स्थानकावरून नियोजित वेळेत सुरू होईल. मुर्डेश्वर-कुंदापूरा विभागादरम्यान अंशतः रद्द होईल.