वेगुर्ला | प्रतिनिधी : न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले या प्रशालेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.या गुणगौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खानोली गावचे सुपुत्र आणि निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत आपल्या वैचारिक मंथनातून वास्तववादी विवेचन केलं तर ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेताना डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद,अशा महापुरुषांच्या जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना समोर मांडले.
या वर्षी आदर्श विद्यार्थीनी म्हणून कु. श्रुती श्रीधर शेवडे आणि आदर्श विद्यार्थी म्हणून कु.दिपेश जयराम वराडकर या दहावीच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्था सचिव तथा जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या शाळेचा माजी विद्यार्थी आणि आघाडीचा तरूण कलावंत प्रथमेश पार्सेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माजी विद्यार्थी वर्गाकडून सांस्कृतिक कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांला स्वर्गीय प्रथमेश पार्सेकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते या वर्षी हा मानाचा पुरस्कार विर नारायण गावडे या विद्यार्थ्यांला देऊन माजी विद्यार्थी संघाचे सदस्य आणि न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले प्रशालेचे लिपिक तसेच उभादांडा गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच चमणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी साठी उत्कृष्ट क्रीडावीर सन्मान कु. शौर्य तारी तर क्रीडाबाला साठी कु.योजना कुर्ले हिला निलेश मांजरेकर आणि राधाकृष्ण मांजरेकर यांनी प्रदान केला. आदर्श शिक्षक पुरस्कारचे या वर्षी चे मानकरी या विद्यालयाचे दीपक बोडेकर सर ठरले.त्याना रमेश पिंगुळकर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. शैक्षणिक वर्षात प्रथम व्दितीय, आणि तृतीय क्रमांक मिळणारे गुणवंत विद्यार्थी तसेच बाह्य स्पर्धेत वक्तृत्व, निंबध, रांगोळी, मॅरेथॉन, दशावतार, कथाकथक , काव्य लेखन अभिनय, लंगार नृत्य, मुहगान,समुहनृत्य आणि विविध प्रकारच्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत बाजी मारत आपल्या शाळेच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हि कौतुक या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर रांगोळीकार रमेश नरसुले, रमेश पिंगुळकर, निलेश मांजरेकर, राधाकृष्ण मांजरेकर, सुजित चमणकर, उभादांडा गावचे सरपंच चमणकर, माजी मुख्याध्यापक कांबळी सर,कुबल सर, मुख्याध्यापक वाळवेकर सर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वाळवेकर सर यांनी केले तर अहवाल सौ.मोहिते मॅडम यांनी सादर केला विशेष निधी ठेव बक्षीस समारंभाचे निवेदन सौ भिसे मॅडम यांनी केले तर क्रीडा क्षेत्रातील बक्षिस संमारंभासाठी सौ अंधारी मॅडम यांनी निवेदन केले.
या कार्यक्रमाचे नियोजन सौ कुबल मॅडम यांनी केले. या वेळी निवृत्त अध्यापिका वाळवेकर मॅडम तसेच श्रीधर शेवडे,भाभी पडवळ, आदी पालक, माजी विद्यार्थी,हि या संमारंभासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक प्रा.वैभव खानोलकर यांनी केले तर आभार बोडेकर सर यांनी मानले या वेळी शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी दिलीप गोठसकर यांनी ही सहकार्य केले.












