Devgad :अनादरीत चेक प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

 

 

देवगड न्यायालयाने सोमवारी एका चेक अनादरीत प्रकरणात आरोपी उदय खानविलकर राहणार पुणे याची निर्दोष मुक्तता केली फिर्यादीने जमसंडे येथून आरोपीला पुणे येथे संन 2015 ते 2017 या काळा मध्ये आंबे विकले होते त्याच्या देण्यापोटी आरोपीने फिर्यदिस रू 1, 85,000 चां चेक दिला होता परंतु फिर्यादी हा आरोपी बरोबर असलेला आंब्यांचा व्यवहार सिद्ध करू शकला नाही

 

तसेच सदर व्यवहारापोटी हा चेंक दिला होता हे सिद्ध करू शकला नाही तसेच त्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा कोर्टासमोर आलेला नाही या महत्त्वाच्या बाबी मेहरबान कोर्टासमोर आल्यामुळे समरी.के. न.15/2818 या केस मध्ये आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आरोपीतर्फे ॲड.शामसुंदर जोशी देवगड यांनी काम पाहिले