माघी गणेश जयंती निमित्त युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने होणार चित्रकला स्पर्धा

११ फेब्रुवारी रोजी माध्यमिक विद्यालय कनेडी, सांगवे येथे होणार स्पर्धा

कणकवली :युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वा माध्यमिक विद्यालय कनेडी, सांगवे येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा तीन गटात होईल.गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मा चिन्ह देऊन गौरविण्यात येईल त्यासाठी गट १ ते ४ साठी

विषय – माझे घर,बगिचा (गार्डन ) माझे गाव

प्रथम ७००द्वितीय ५००तृतीय ३०० उत्तेजनार्थ अशी बकशिसे आहेत.

गट ५ते ७ साठी विषय.गणेश जयंती, वनभोजन,आवडता खेळ प्रथम १०००

द्वितीय ७००,तृतीय ५०० उत्तेजनार्थ दोन बक्षिसे आहेत.

गट ८ते १० साठी विषय आवडता सण

,कोरोना काळातील योद्धे ,दशावतारातील नाटकातील कोणताही एक प्रसंग

प्रथम १५००रू, द्वितीय १०००

तृतीय ७००उत्तजनार्थ प्रत्येक ३०० रुपये बक्षिसे आहेत

तरी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सौ संजना संदेश सावंत अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान तथा माजी जि प अध्यक्ष सिंधुदूर्ग आणि श्री संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी जि प अध्यक्ष सिंधुदूर्ग यांच्या वतीने करण्यात येत आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क श्री संदीप तांबे सर ९४२२५६५२८०यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.