समाज कार्यामध्ये कायम अग्रेसर असलेल्या ए. एच. ए. हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, पिंपळी यांनी नुकतेच मकर संक्रांती सणाचे औचित्य साधून महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमासोबत मोफत बेकरी व कन्फेकशनरी चे प्रशिक्षण आयोजित केले होते. सदर कार्यक्रमाचा लाभ परिसरातील शंभरहून अधिक महिलांनी घेतला. या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले व असे समाज उपयोगी व महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणारे प्रशिक्षण महाविद्यालयाने यापुढेही चालू ठेवावे अशी मागणी करण्यात आली.
सदर कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. रोहिणी ओतारी यांनी केले, तसेच कार्यक्रमात प्रशिक्षण देण्याचे कार्य प्राध्यापक सौ. प्रणाली बागडे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक ललित काडवेलकर, प्राध्यापक श्रद्धा कांबळे व श्री जाधव सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.











