महिला गटात सलोनी नाईक प्रथम तर मनाली गवस द्वितीय
सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित नमो चषक क्रिडा स्पर्धा २०२४ अंतर्गत माजी आमदार राजन तेली व युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या सौजन्याने पार पडलेल्या १०० मीटर धावणे व ४०० मीटर धावणे या स्पर्धेत अनिरुद्ध शेट्कर यांनी प्रथम तर शुभम देसाई यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. महिला गटात सलोनी नाईक प्रथम तर मनली गवस द्वितीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे बक्षिस वितरण भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रथमेश तेली साहेब त्यांच्या समवेत श्री.रंगनाथ गवस,माजी तालुकाध्यक्ष श्री.प्रविण गवस, खोक्रल सरपंच श्री.देंवेद्र शेटकर , दोडामार्ग नगरपंचायत नगररसेवीका सौ.स्वराली गवस, मनोज पार्सेकर,आकांशा शेटकर,झरे – २ सरपंच सौ.श्रुती देसाई,स्वप्निल गवस , साजन गवस, विशाल चव्हाण व स्पर्धक उपस्थित होते.












