चिपळूण (प्रतिनिधी) : मत्स्यगंधा एक्सप्रेसने कारवार ते चिपळूण असा प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. ही घटना दि. १ व २ फेब्रुवारी दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद विनोदा सतीश मंगलूरकर (रा. वाशी नवी मुंबई) यांनी येथील पोलिसांत दिली आहे.
यानुसार विनोदा या मत्स्यगंधा एक्सप्रेस ने कारवार ते चिपळूण असा प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन पर्स मधील १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. यामध्ये दोन मोबाईल, सोनसाखळी व ५ हजार ५०० रुपयांची रोकड असा मुद्देमालाचा समावेश आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.










