राजापूर (वार्ताहर): भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जैतापूरचे विभागीय अध्यक्ष व उद्योजक वैभव कुवेसकर यांच्या मातोश्री श्रीमती हेमलता वासुदेव कुवेसकर (८३) यांचे रविवार ४ फेब्रुवारी रोजी पहाटे रत्नागिरी येथे निधन झाले.
कै.हेमलता कुवेसकर या सुसंस्कृत घराण्यातील धार्मिक वृतीच्या होत्या. त्यांनी पतीच्या निधनांनंतर वैभव हार्डवेअर, स्वॉमिल हे व्यवसाय मुलांच्या साथीने यशस्वीरित्या सांभाळले. त्यांच्या पार्थीवार रविवारी दुपारी अंत्यंसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मुलगे, मुलगी, जावई मधुकर टिळेकर, सून, नातवंडे, पुतणे अॅड. अविनाश कुवेसकर असा परिवार आहे.












