अनधिकृत वाळू रॅम्प जमीनदोस्त

हडी येथे मालवण महसूल पथकाची कारवाई 

मालवण | प्रतिनिधी : कालावल खाडी किनारी हडी येथील कालिका मंदिर, जुनी जेटी व चार पोल या ठिकाणी अनधिकृत वाळू उत्खननासाठी अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेले 18 रॅम्प मालवण महसूल पथकाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले आहेत.

 

मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही करावाई केली आहे. दरम्यान खाडी पात्रात अनेक होड्या दिसून आल्या आहेत. त

या होड्यांची तपासणी करून अनधिकृत होड्यांवर बंदर विभागाने कारवाई करावी. तसेच परप्रांतीय कामगार यांचा वावर पाहता त्याच्या मदतीने रात्री अनधिकृत वाळू उत्खनन होते. तरी पोलीस प्रशासनाकडून चौकशी करावी. अशी माहिती मालवण तहसील कार्यालय महसूल शाखेच्या वतीने 6 फेब्रुवारी रोजी देण्यात आली.

 

गेले काही दिवस सातत्याने तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पोलीस, बंदर विभाग यांच्या माध्यमातून धडक कारवाई सूरू आहे. वाळू उत्खनन वाहतूक मार्गांवर पथक नेमणूक करूनही करवाई केली जात आहे.