कळसवली येथे श्री गणेश मुर्ती प्रतिष्ठापना व माघी गणेश जयंती उत्सवाचेआयोजन

 

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील कळसवली येथील जागृती विकास मंडळाच्या वतीने शनिवार १० फेब्रुवारी रोजी शेडेकरवाडी येथे उभारण्यात आलेल्या श्री गणेश मंदिरात मुर्तीप्रतिष्ठापना आणि मंगळवार १३ व बुधवार १४ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार १० फेब्रुवारी रोजी श्री गणेश मंदिरात मुर्तीप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त सकाळी ८ वाजता श्री गणेश मूर्तीची मुर्तीप्रतिष्ठापना, दुपारी २ वाजता आरती, महाप्रसाद, तर रात्रौ ८.३० वाजता आरती व स्थानिक मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

मंगळवार १३ रोजी श्री गणेश जयंती निमित्त सकाळी ८ वाजता श्री गणेश मुर्तीचे आगमन व पूजन, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, हळदीकुंकू समारंभ, रात्रौ ८ वाजता आरती, भजन, ९ वाजता ढोलवादन व पालखीनृत्य, तर रात्रौ १०.३० वा. गाभारा हे तीन अंकी नाटक सादर केले जाणार आहे.

बुधवार १४ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री गणेश मुर्तीची विसर्जन मिरवणुक काढून उत्सवाची सांगता होणार आहे.

तरी भाविकांनी उपस्थीत राहून दर्शनाचा व तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन जागृती विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव सुर्वे, सचिव वैभव ठाकुरदेसाई यांनी केले आहे.

————————————————————–