वेंगुर्ले l प्रतिनिधी :अणसूर धरमगावडेवाडी येथे सदगुरू श्री वामनराव पै जन्मशताब्दीवर्षानिमित्ताने, आयोजित प्रबोधन कार्यक्रमात, जीवन विद्या मिशन शाखा दादर- मुंबई यांचेमार्फत विविध प्रकारच्या विषयांवर आधारित वाचन पुस्तकांची ग्रंथ भेट
जेष्ठ प्रबोधनकार श्री.अशोकजी नाईक यांच्याहस्ते अणसूर-पाल हायस्कूलला प्रदान करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री आत्माराम गावडे , उत्तम गावडे – -वेंगुर्ले, शालेय विद्यार्थी – विद्यार्थीनी ,पालक , नामधारक साधक व श्रोतु वर्ग उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या वाचन समृद्धीसाठी उपयुक्त पुस्तकांच्या ग्रंथ भेटीबद्दल मुख्याध्यापक श्री राजेश घाटवळ यांनी जीवन विद्या मिशन शाखा दादर-मुंबई यांचे शाळेच्यावतीने आभार मानले.









