आजगांव अग्निवेताळ मंदिराचा २१ रोजी जत्रोत्सव 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : आजगांव येथील अग्निवेताळ मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. त्या निमित्त सकाळी ८ वाजता देवतेवर अभिषेक व पूजा दुपारी १२ वाजता आरती महागाऱ्हाणे व दुपारी महाप्रसाद, देवतेस केळी ठेवणे, नारळ ठेवणे, ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत.

तर संध्याकाळी पालखी फटाक्यांची आतषबाजी व त्यानंतर रात्री आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी सर्वांनी या जत्रोत्सवास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.